वाहनाने साळींदरला चिरडले, रस्त्यावर त्याचे काटे पसरले
By शीतलकुमार कांबळे | Updated: January 11, 2024 14:00 IST2024-01-11T14:00:34+5:302024-01-11T14:00:55+5:30
सोलापूर : वन्यजीवांमध्ये दुर्मिळ समजला जाणारा साळींदराचा बोरामणी जवळ अपघातात मृत्यू झाला. वाहनाने साळींदरला चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू ...

वाहनाने साळींदरला चिरडले, रस्त्यावर त्याचे काटे पसरले
सोलापूर : वन्यजीवांमध्ये दुर्मिळ समजला जाणारा साळींदराचा बोरामणी जवळ अपघातात मृत्यू झाला. वाहनाने साळींदरला चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. साळींदरच्या अंगावरील काटा अपघातानंतर रस्त्यावर पसरले.
वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे संतोष धाकपाडे व मार्गदर्शक शिवानंद हिरेमठ हे निसर्ग छायाचित्रणासाठी बोरामणीला जात होते. त्यावेळी त्यांनी प्राणी मरुन पडल्याचे दिसून आले. जवळ गेल्यानंतर साळींदर असून त्याच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
धाकपाडे यांनी याची माहिती वन विभागाला दिली. तसेच मृत साळींदरचे शरीर रस्त्यावरून बाजूला सारले.
बोरामणी परिसरात यासारख्या घटना सारख्या घडत आहेत. याआधी नोव्हेंबर महिन्यात साळींदर आणि उदमांजराचा मृत्यू झाला होता. परिसरात वन्यजीवांचा मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्यासाठी महामार्गाच्या ठिकाणी अंडरपास करणे गरजेचे असल्याचे वन्यप्रेमींनी सांगितले.