ऐकलं का? आता अधिकारीच तुमच्या घरी येतील; मतदार यादीत नाव आहे का पाहा

By Appasaheb.patil | Published: July 21, 2023 02:46 PM2023-07-21T14:46:31+5:302023-07-21T14:47:36+5:30

मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत असं आयोगाने आवाहन केले.

The voters will be verified by house-to-house visits by Election Commission | ऐकलं का? आता अधिकारीच तुमच्या घरी येतील; मतदार यादीत नाव आहे का पाहा

ऐकलं का? आता अधिकारीच तुमच्या घरी येतील; मतदार यादीत नाव आहे का पाहा

googlenewsNext

सोलापूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात २१ जुलै ते २१ ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. 

२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तीक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मयत आणि स्थालांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार आहे.

दरम्यान, जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपलं स्वतःचं तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावं, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत, लग्नानंतर नाव बदलेल्या स्त्री मतदारांनी आपली नांव बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्याची नोंद करुन घ्यावी असेही आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Web Title: The voters will be verified by house-to-house visits by Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.