बायकोने नवऱ्यावर दाखल केला ॲट्रॉसिटीचा खटला

By Appasaheb.patil | Published: January 2, 2024 07:47 PM2024-01-02T19:47:04+5:302024-01-02T19:48:27+5:30

बायकोकडून स्वतःच्या नव-यावर ॲट्राॕसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

The wife filed an atrocity case against the husband | बायकोने नवऱ्यावर दाखल केला ॲट्रॉसिटीचा खटला

बायकोने नवऱ्यावर दाखल केला ॲट्रॉसिटीचा खटला

 सोलापूर : केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरूध्द पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून ॲट्राॕसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु एका महिलेने आपल्याच नव-यावर ॲट्राॕसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदविण्याचा आनोखा प्रकार पंढरपुरात घडला आहे. न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नव-यावर ॲट्राॕसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवरा-बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोण चक्क ॲट्राॕसिटी कायद्याखाली नव-याविरूध्द फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचले आहे. या अनोख्या खटल्याची माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी यांचा प्रेम विवाह झाला होता. फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील. वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या. परंतु अलिकडे काही दिवसांपासून नवऱ्याकडून आपणांस जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते. नव-याने आपल्या इच्छेविरूध्द लैंगिक अत्याचारही केला, अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली

जामीनासाठी नवऱ्याने दाखल केला कोर्टात अर्ज

दरम्यान, आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली आहे, त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याने नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने ,ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड वैभव सुतार हे काम पाहत आहेत.

Web Title: The wife filed an atrocity case against the husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.