पूर्वीच्या भांडणातून तरुणाला घेरुन जमावाकडून बॅट अन् स्टंपनं केली धुलाई
By दिपक दुपारगुडे | Published: May 3, 2023 06:27 PM2023-05-03T18:27:06+5:302023-05-03T18:27:29+5:30
बसव जयंतीमध्ये लई शहानपना करीत होता असे म्हणत जमावाने तरुणाला बॅट, स्टंपने धुलाई करुन जखमी केले.
सोलापूर : बसव जयंतीमध्ये लई शहानपना करीत होता असे म्हणत जमावाने तरुणाला बॅट, स्टंपने धुलाई करुन जखमी केले. या प्रकरणी जखमी अमोल माने (वय- २५) याच्या तक्रारीवरुन सातजणांविरुद्ध मंगळवारी (२ मे ) गुन्हा नोंदला आहे.
याती फिर्यादी अमोल भारत माने (वय २५, रा. खैरदीनगर, गणपती मंदिराजवळ, सोलापूर) हा शेती व्यवसाय करतो. नुकत्याच झालेल्या बसव जयंतीच्यावेळी अमोल व जमावातील लोकांचे भांडण झाले होते. सोमवारी सायंकाळी अमोल व त्याचा मामा गणपती मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. यावेळी पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आकाश सोनकांबळे, संतोष सोनकांबळे, विजय तारापूरे, संकेत डंके, सचिन घागरे, अमर मकाई, तेजस लोहार तेथे आले. भांडण उकरुन काढायचे म्हणून सर्वांनी मिळून अमोलला बॅट, स्टंपने, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आणि निघून गेले.
याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात वरील सातजणांविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.