संतापजनक! तरुणाला आधी विवस्त्र करून मारहाण; नंतर चटके देऊन केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 20:38 IST2025-03-12T20:38:06+5:302025-03-12T20:38:26+5:30
चटके देऊन खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

संतापजनक! तरुणाला आधी विवस्त्र करून मारहाण; नंतर चटके देऊन केला खून
माळशिरस : राज्यभर विविध खून प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच माळशिरस शहराच्या बाजूला पिलीव-चांदापुरी रस्त्यालगत एका २८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर त्याला चटके देऊन खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पिलीव चांदापुरी रोडवर वनविभागाच्या क्षेत्रामधून मेटकरी मळ्याकडे जाणाऱ्या रोडलगत आकाश अंकुश खुर्द (वय २८) या तरुणाला १० मार्च रोजी रात्री ८.३० ते ११ मार्च रोजी सकाळी ९.३० दरम्यान मारेकऱ्यानी गंभीर मारहाण केली. त्यानंतर त्याला चटके देऊन त्यास गंभीर जखमी केले. प्राथमिक तपासात त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी तेथे एम. एच. ४५ / ए. डब्ल्यू ५८२१ दुचाकी आढळली.
दरम्यान, प्रभारी डी.वाय.एस.पी. राहुल मडावी अधिक तपास करत आहेत.