दुचाकी घसरुन पडल्यानं जखमी झालेला तरुण रुग्णालयातून पळाला
By विलास जळकोटकर | Published: April 17, 2023 04:22 PM2023-04-17T16:22:21+5:302023-04-17T16:22:49+5:30
उपचार सुरु असताना तो शुद्धीवर येताच डाॅक्टर, परिचारिकांची नजर चुकवून पळून गेला.
विलास जळकोटकर
सोलापूर : हैद्राबाद रोडमार्गे सोलापूरकडे दुचाकीवरुन येणारा तरुण अचानक दुचाकी रोडवरच घसरुन पडल्यानं गंभीर जखमी झाला. बोरामणी पोलीस चौकीसमोरील रोडवर रविवारी ११:१५ च्या सुमारास ही घटना घडली. त्याला अर्धवट शुद्धीमध्ये रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर उपचार सुरु असताना तो शुद्धीवर येताच डाॅक्टर, परिचारिकांची नजर चुकवून पळून गेला. त्याची ओळखही पटलेली नाही अशातच तो पळून गेल्याने डॉक्टरांनी पोलिसांना खबर दिली आहे. त्याची शोधमोहीम सुरु आहे. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे.