डिसले गुरुजींकडून १७ लाखांचे वेतन करणार वसूल; विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

By शीतलकुमार कांबळे | Published: July 13, 2022 06:41 PM2022-07-13T18:41:20+5:302022-07-13T18:41:31+5:30

रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.

The Zilla Parishad administration will recover a salary of Rs 17 lakh for 34 months from Ranjitsinh Disale | डिसले गुरुजींकडून १७ लाखांचे वेतन करणार वसूल; विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

डिसले गुरुजींकडून १७ लाखांचे वेतन करणार वसूल; विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

Next

सोलापूर : ग्लोबल टिचर अवार्डचे विजेते रणजितसिंह डिसले यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासन 34 महिन्याचा तब्बल 17 लाख रुपये वेतन वसूल करणार आहेत. डाएटकडे (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) प्रतिनियुक्तीवर असताना गैरहजर असल्याच्या प्रकरणात ही कारवाई होणार आहे, अशी माहीती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली. 

रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. ते बार्शी तालुक्याचील परितेवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. राजीनामा दिल्यापासून एक महिन्याचा कालावधी हा नोटीस पिरीयडचा आहे. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय होणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डाएट) प्रतिनियुक्‍ती असतानाही ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे ना "डाएट' व परितेवाडी येथील शाळेकडे गेले नसल्याचे डायटकडून जानेवारी महिन्यात सांगण्यात आले होते. या दरम्यान त्यांना 35 महिन्यांचे वेतन देण्यात आले. आता, नोव्हेंबर 2017 ते ऑक्‍टोबर 2020 या काळातील वेतन त्यांच्याकडून परत घेण्यात येणार आहे.

Web Title: The Zilla Parishad administration will recover a salary of Rs 17 lakh for 34 months from Ranjitsinh Disale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.