रंगभूमी, तरूणाई अन् तालीम....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:56 PM2019-03-03T16:56:14+5:302019-03-03T16:57:41+5:30

रंगभूमी ही कलाकारांची खºया अर्थाने कर्मभूमी असते. आपल्या आयुष्यातील दररोज काही वेळ कलाकाराला रंगभूमीसाठी सातत्याने द्यावे, असे वाटत असते ...

Theater, Tarunai and Talim ....! | रंगभूमी, तरूणाई अन् तालीम....!

रंगभूमी, तरूणाई अन् तालीम....!

Next
ठळक मुद्देमाणसाच्या, कलाकाराच्या सर्जनशीलता जोपासण्याचे काम रंगभूमी अव्याहतपणे, सतत करत असतेरंगभूमीची सेवा करत असताना मात्र कलाकाराला अनंत आणि असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते

रंगभूमी ही कलाकारांची खºया अर्थाने कर्मभूमी असते. आपल्या आयुष्यातील दररोज काही वेळ कलाकाराला रंगभूमीसाठी सातत्याने द्यावे, असे वाटत असते आणि तो कलाकार तसा वेळ देत देत रंगभूमीची अखंडपणे, अव्याहतपणे सेवा करत जगत असतो. सच्चा निष्ठावंत कलाकाराची कामकाज ही ‘उपजीविका’ असते. परंतु, रंगभूमीची सेवा करत असताना मात्र कलाकाराला अनंत आणि असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. समस्यांची ही मालिका कधी कधी अखंड असते, संपता संपत नाही आणि याच समस्यांमधून जन्म घेत असते एक ‘नवनिर्मिती’ ! माणसाच्या, कलाकाराच्या सर्जनशीलता जोपासण्याचे काम रंगभूमी अव्याहतपणे, सतत करत असते, हे निर्विवाद आहे !

पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी नाटक आणि रंगभूमी यासाठी कार्य करणारे अत्यंत उपक्रमशील असे कलाकार तयार होत असतात. अनेक कार्यशाळांमधून, शिबिरांमधून असे कलाकार घडविण्याचे कार्य चालू असते. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी या रंगभूमीला पोषक असे वातावरण असल्याचे नेहमीच वाटत असते. परंतु, ज्यावेळी आपण रंगभूमीचा इतिहास धुंडाळतो त्यावेळी जाणवते की त्याठिकाणी आलेली ही समृद्धी काही एका रात्रीतून आलेली नाही. त्या ठिकाणच्या, त्यावेळच्या अनेक दिग्दर्शक,कलाकार, निर्माते यांनाही अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते. नाटकसंहिता लिखाणापासून ते रंगभूमीवर सादर करणे इथपर्यंत दीर्घ टीमवर्क असल्याचे मान्य करावे लागते. एकमेकांच्या सहकार्याने, मदतीने आणि सर्वांमध्ये असलेल्या रंगभूमीवरील ‘निष्ठेने’ नाट्यनिर्मिती घडत असते.

रंगभूमीवरील ‘निष्ठा’ हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजकाल कलाकारांच्या वर्तनाकडे पाहता थोडेसे नैराश्य येते. नाट्यनिर्मिती ही प्रदीर्घ अशी प्रणाली आहे. या प्रदीर्घ प्रणालीमध्ये पाठांतर, तालमी यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना, या दोन्ही गोष्टी अपरिहार्य आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नेमक्या याच गोष्टींना आजची तरुणाई बगल देताना दिसून येते. आज समाजात वाढलेल्या अनेक माध्यमांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला असल्याचे जाणवते.

‘पी हळद अन् हो गोरी’ असे आजच्या तरुणाईला, कुठलीही गोष्ट पटकन घडावी असेच वाटत असते. त्यामुळे होते काय की पाठांतर आणि तालमी यांच्या अभावामुळे निर्माण होत असलेली कलाकृती ही तेवढी दर्जेदार नसते. दर्जेदार कलाकृतींसाठी संहिता, त्यातील आशय, त्याची मांडणी, कलाकारांचे योगदान, तांत्रिक गोष्टींचा योग्य वापर या सर्वच्या सर्व बाबी या अत्यंत विचारपूर्वक योजाव्या लागतात. त्यासाठी आपल्या तरुणाईने जास्तीत जास्त अभ्यास, कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास उत्कृष्ट नाट्यनिर्मिती होण्याला वेळ लागणार नाही.

तरुणाईने सर्वात प्रथम रंगभूमीवर प्रेम करणे आवश्यक आहे. कुठल्याही अडीअडचणीतून मार्ग काढण्याची तत्परता अंगात वागवणे आवश्यक आहे. अनेक उत्तमोत्तम विषय आज नाट्यलेखकांना सापडत आहेत. तसे काही लेखक लेखन करतानाही दिसून येत आहेत. अशा उत्कृष्ट नाट्यसंहितेला न्याय देण्याचे काम मात्र दिग्दर्शकाला आणि त्यात काम करणाºया कलाकाराला करावे लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास, भूमिकेची समज, अवलोकन, अनुसरण आणि तालीम या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.

‘प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट’ असे म्हटले जाते, ते उगाच नाही. म्हणूनच नाटकाची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. आजच्या तरुणाईला प्रॅक्टिस ही प्रोसेस खूप कंटाळवाणी वाटत असते. परंतु, या गोष्टीला ‘शॉर्टकट’ कुठेच नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. शेवटी काय अभ्यास, आकलन, अनुभव, अनुसरण या सर्व गोष्टी नाटकासाठी अत्यंत आवश्यक आहेत़
- नागेंद्र माणेकरी
(लेखक हे एक नाट्यलेखक व दिग्दर्शक आहेत.)

Web Title: Theater, Tarunai and Talim ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.