गोडसेवाडी येथील विजेच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:37+5:302021-07-21T04:16:37+5:30
वाढेगाव येथील सिद्धेश्वर बाबूराव भोसले हे जी आर इन्ट्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये लायजनिंग असिस्टंट म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे राष्ट्रीय ...
वाढेगाव येथील सिद्धेश्वर बाबूराव भोसले हे जी आर इन्ट्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये लायजनिंग असिस्टंट म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या चालू असलेल्या कामांपैकी वाटंबरे ते मंगळवेढा देखरेखीचे काम सोपविले आहे. या रोडवर सुविधेप्रमाणे विजेचे दिवे बसविण्याच्या कामापैकी सांगोला-मिरज जाणाऱ्या गोडसेवाडी रोडवर साधारण १५० दिवे बसविले आहेत. दरम्यान, १९ जुलै रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास सिद्धेश्वर भोसले हे गोडसेवाडी येथील चालू कामावर आले असता, तेथे बसविलेल्या १५० खांबांपैकी १५ खांबांवरील दिव्यांना जोडण्यात आलेली वायर (केबल) गायब असल्याचे दिसले.
त्यांनी कंपनीतील इतरांसह वरिष्ठांना संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी माहीत नसल्याचे सांगितले. अज्ञात चोरट्याने अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे १० स्कोर एमएम ४ कोअर अंदाजे ६०० ते ७०० मीटर काळ्या रंगाची केबल, ९९० रुपये किमतीचे ६० बाय ४ स्ट्रिप्स, ३ हजार रुपये किमतीचे १५ एमसीबी असे सुमारे ५३ हजार ९९० रुपयाचे साहित्य चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत सिद्धेश्वर बाबूराव भोसले (रा. वाढेगाव) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.