देवस्थानकडून घेतलेले पैसे भरण्यासाठी शेजारच्या घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:13+5:302021-04-25T04:22:13+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शमशाद अफसर मुलाणी (वय ३८, रा. मुलाणी वस्ती, तारापूर) यांच्या उघड्या घरातील उघड्या कपाटामधून १ तोळे ...

Theft to a neighboring house to pay for money taken from the temple | देवस्थानकडून घेतलेले पैसे भरण्यासाठी शेजारच्या घरात चोरी

देवस्थानकडून घेतलेले पैसे भरण्यासाठी शेजारच्या घरात चोरी

Next

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शमशाद अफसर मुलाणी (वय ३८, रा. मुलाणी वस्ती, तारापूर) यांच्या उघड्या घरातील उघड्या कपाटामधून १ तोळे वजनाचे गळ्यातील गलसर, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे कानातील गलसर जुनी किंमत ४५ हजार रुपये किमतीचे सोने चोरट्याने पळवून नेले. ही घटना ६ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत घडली.

या गुन्ह्याचा तपास पोनि. किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन चवरे करीत होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना शमशाद अफसर मुलाणी यांच्या शेजारी राहणारा आशपाक राजवल्ली मुलाणी याने चोरी केल्याची माहिती नितीन चवरे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्याबाबत अधिक तपास केल्यानंतर चोरीस गेलेले सोने हे आशपाक याने चोरल्याची खात्री पटली.

सुस्ते (ता. पंढरपूर) गावातील दर्लिंग देवस्थानकडून घेतलेले पैसे भरावयाचे आहेत. हे सोने माझ्या आईचे आहे. सोने तू तुझ्या नावे सप्तश्रृंगी फायनान्स सुस्ते येथे ठेव, असे आशपाक याने मित्राला सांगितले व त्याने त्या मित्राच्या नावावर सोने ठेवून रक्कम घेऊन गावातील दर्लिंग ट्रस्टमध्ये भरली असल्याचे तपासात समोर आले. आशपाक मुलाणी याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन न्यायाधीशांनी त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Theft to a neighboring house to pay for money taken from the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.