मेंढापुरात भरदिवसा घर फोडून सव्वाचार लाखांच्या दागिन्यांची चोरी; दोन दिवसात दुसरी घटना  

By संताजी शिंदे | Published: February 13, 2024 07:29 PM2024-02-13T19:29:24+5:302024-02-13T19:29:43+5:30

ही घटना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर गावात घडली.

theft of jewelery worth 1.4 million by breaking into a house in broad daylight in Mendhapur Second incident in two days | मेंढापुरात भरदिवसा घर फोडून सव्वाचार लाखांच्या दागिन्यांची चोरी; दोन दिवसात दुसरी घटना  

मेंढापुरात भरदिवसा घर फोडून सव्वाचार लाखांच्या दागिन्यांची चोरी; दोन दिवसात दुसरी घटना  

सोलापूर: भर दिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह ४ लाख १२ हजार ४०० रूपये सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. ही घटना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर गावात घडली. हा खळबळजनक प्रकार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडला. करकंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ दिवसात ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. १ फेब्रुवारी रोजी करकंब येथील नेमतवाडी चौकातील साईप्रसाद मशिनरी या शेती उपयोगी साहित्याच्या दुकानातील ६ लाख २४ हजार रुपयेच्या मुद्देमालाची धाडशी चोरी करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेचा तपास पोलिसांना अद्याप लागला नाही.

सोमवारी मेंढापुर येथील शेतकरी परमेश्वर दत्तू व्यवहारे यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख ५० हजार रूपये चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये ४८ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनचे नेकलेस, ९६ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे दोन गंठण, १४ हजार ४०० रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाचे कानातील बाजीगर, ३६ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या ठुशी, २४ हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ, ४८ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुले झुबे, ९६ हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची आंगठी व ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख १२ हजार ४०० रुपयेचा मुद्देमालाची चोरीला गेला आहे. करकंब पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरूद्द गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: theft of jewelery worth 1.4 million by breaking into a house in broad daylight in Mendhapur Second incident in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.