कोतवालाच्या भावाच्या घरात ४७ हजारांची चोरी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:40+5:302021-07-25T04:20:40+5:30
याप्रकरणी रामहरी मोरे (वय ३७, व्यवसाय शेती, रा. झरे, सध्या रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली असून करमाळा पोलिसात एका ...
याप्रकरणी रामहरी मोरे (वय ३७, व्यवसाय शेती, रा. झरे, सध्या रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली असून करमाळा पोलिसात एका अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझा भाऊ नारायण विठ्ठल मोरे हा कुटुंबासह माझ्यापासून विभक्त असून तो झरे येथे राहतो. मी कोतवाल म्हणून झरे व कुंभेज या गावचे काम करतो. भावजय रेखा नारायण मोरे यांनी सांगितले की, गुरुवारी (ता. २२) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जेवण करुन झोपी गेलो होतो. मुलगी भारती नारायण मोरे ही रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करीत होती.
सकाळी शेजारच्या रुमचा दरवाजा उघडा दिसला आतमध्ये जाऊन पाहिले तेव्हा घरातील कपडे इतरत्र पडलेले दिसले. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे एक तोळ्याचे गळ्यातील गंठण व लहान मुलाची सोन्याची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरट्याने चोरुन नेली. यात ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
----