पंढरपुरातील दत्त मंदिरातून चांदीचे मुकूट चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:46 AM2018-11-29T10:46:01+5:302018-11-29T10:49:57+5:30
पंढरपूर : येथील मुक्ताबाई माठासमोरील चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दत्त घाटा जवळील दत्त मंदिरामध्ये चांदीच्या मुकुटांची चोरी बुधवारी रात्री झाली आहे. ...
Next
ठळक मुद्दे- बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांचा मंदिरातील चांदीच्या मुकुट पळविले- पोलीस घटनास्थळी दाखल- गुन्हा दाखल करण्याचे काम पंढरपूर पोलीसात सुरू
पंढरपूर : येथील मुक्ताबाई माठासमोरील चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दत्त घाटा जवळील दत्तमंदिरामध्ये चांदीच्या मुकुटांची चोरी बुधवारी रात्री झाली आहे.
दत्तमंदिरामध्ये ब्रह्म विष्णू महेश अशा तीन मूर्ती आहेत. तीन मूर्तीच्या डोक्यावर चांदीचे मुकुट आहेत. तीन मुकुट अंदाजे दीड ते अडीच किलो वजन आहे. या मुकुटाची अज्ञात इसमाने बुधवारी रात्री चोरी केली आहे.
मंदिराचे पुजारी दत्तात्रय महादेव वैद्य हे पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे समजले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...