मार्डीत यमाई मंदिरात चोरी; ४० किलो चांदीसह सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:26 PM2019-12-23T12:26:22+5:302019-12-23T12:29:27+5:30
सोलापूर ग्रामीण पोलीसांचे पथक दाखल; चोरट्यांच्या शोधासाठी पोलीसांचे पथके रवाना
सोलापूर : सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील यमाई देवी मंदिरात सोमवारी पहाटे चोरीची घटना घडली. चोरट्याने देवीचे मुकुट, मूर्तीच्या मागील चांदीचे सजावटीचे साहित्य असे एकूण ४० किलो चांदी, देवीच्या अंगावरील सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील जवळपास अडीच लाख रुपयांची रोकड चोरुन नेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ या घटनेची माहिती पोलीस घेत आहेत़ तपास कामात काही माहिती मिळेल का म्हणून पोलीसांनी मंदिर परिसरातील विविध भागाची पाहणी केली़ सकाळपासून मार्डीत फक्त अन फक्त मंदिरातील चोरीच्याच घटनेची चर्चा सुरू आहे.