तर आत्महत्येची वेळ येईल; वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी व्यक्त केली चिंता
By Appasaheb.patil | Published: April 25, 2022 01:20 PM2022-04-25T13:20:57+5:302022-04-25T13:21:42+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : साखर सरपल्स झाली आहे. ब्राझीलमध्ये साखर वाढली तर २२ रुपये साखरेचा भाव होईल. त्यावेळी मात्र उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा. नाहीतर ऊसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी यांनी सोलापुरात चिंता व्यक्त केली.
सोलापुरात आयोजित नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्यासह अन्य आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा. कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे. आपण साखर उत्पादनमध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले. काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते. त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून आज महाराष्ट्रातील साखरेला चांगला भाव मिळतोय. भविष्यात साखरेला भाव मिळणे कठीण होणार आहे, त्यामुळे आतापासूनच साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर भर द्या असेही आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.