ठेंगीलवाडी, खांडेकर वस्ती, गावडेवाडी, येळेगाव, पांगलेवाडी गावे केली सील
By Appasaheb.patil | Published: April 9, 2020 09:17 PM2020-04-09T21:17:49+5:302020-04-09T21:26:37+5:30
सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही; 194 पैकी 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 53 जणांचे अहवाल येणे बाकी...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज आज 9 एप्रिल सायंकाळपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही ,अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी नजीकच्या ठेंगीलवाडी येथील एक व्यक्ती ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना बाधित पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने
ठेंगीलवाडी कांबळवाडी, खांडेकर वस्ती, गावडेवाडी, येळेगाव, पांगलेवाडी ही गावं बंदिस्त केली आहेत. या भागात 3334 लोकसंख्या असून 611 घर आहेत. या सर्व व्यक्ती आणि घरांची तपासणी करण्यात आली असून येते 14 दिवस या गावातील प्रत्येक व्यक्तीची रोज आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. येथे आता कोणाला जाता येणार नाही किंवा येथून कोणाला बाहेरही पडता येणार नाही.
ज्या 46 व्यक्तींचा त्या रुग्णाशी थेट संपर्क आला आहे, या सर्वांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येत असून त्याचे अहवालही लवकरच प्राप्त होतील.
सिव्हिल हॉस्पिटल मधील आयसोलेशन विभागात आत्तापर्यंत 194 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजुन 54 जणांचे अहवाल येणार आहेत. यात जवळपास 44 व्यक्ती या वांगी आणि परिसरातील आहेत.
बँकांपुढे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासन बँकांच्या वेळात बदल करण्याचा विचार करत आहे .
सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत बँका उघड्या ठेवण्यास संबंधि जिल्हाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापनाची चर्चा केली आहे. तसेच बँकांना समोरील गर्दी टाळावी. उभे राहणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सुविधा करावी असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून काऊंटर वाढवावेत असंही सांगितलं आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तांनी शहराच्या सर्व आठही नाक्यांवर आजपासून पोलीस तैनात केले असून बॉर्डर सीलिंग केली आहे . आता फक्त पासधारी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, शासकीय कर्मचारी तसेच गंभीर स्वरूपाचे रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
आज पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाला मास्क किंवा रुमाल तोंडाला लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
संचारबंदी लॉक डाऊन सुरू असतानाही शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालक तसेच नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई आजही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 2050 दुचाकी वाहन शहरात जप्त करण्यात आली आहेत.
सोलापूरचे आजचे तापमान
09 एप्रिल 2020
से.ग्रे. फँरनाईट
कमाल तापमान
40.1 104.2
किमान तापमान
23.0 73.4
आर्द्रता 18 %
पाऊस 0