यात्रेनिमित्त पंढरीत दररोज येतात ५५ हजार वाहने
By admin | Published: July 1, 2017 12:18 PM2017-07-01T12:18:37+5:302017-07-01T12:18:37+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर : सचिन कांबळे
पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त श्री पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून रोज सुमारे ५५ हजार वाहने दाखल होतात. शहरातील विविध आठ ठिकाणी नि:शुल्क वाहन पार्किंगची सोय वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आली आहे.
पंढरपुरात भरणाऱ्या चार यात्रांपैकी आषाढी यात्रेचा सोहळा मोठा असतो. यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. आषाढी यात्रेच्या कालावधीत चारचाकी वाहने, जडवाहतूक शहरातून बंद करण्यात येते. तसेच प्रदक्षिणा मार्ग, व्ही.आय.पी. रोड, स्टेशन रोड येथे सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जातो. मात्र अत्यावश्यक सोयी पुरविणाऱ्या, वारकऱ्यांचे अन्न असलेले वाहन, पाण्याच्या टॅँकरला व वैद्यकीय अधिकारी यांना पोलीस वाहतूक शाखेकडून परवाना देण्यात आला आहे. गर्दीत अपघात होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बसस्थानकदेखील गर्दीच्या ठिकाणापासून शहराबाहेर नेले आहे़ तसेच शहरात नवीन सोलापूर नाका, सरगम चौक, सहकार चौक, सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस व नवीन सोलापूर नाका अशी एकेरी वाहतूक करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे अधिकारी नीलेश गोपाळचावडीकर व सपोनि सारंग चव्हाण यांनी दिली.
-------------------
या ठिकाणी पार्किंगची सोय
पंढरपूर शहरात अंबाबाई पटांगण, मोहोळ रोड विसावा, इसबावी विसावा, कंडरे जिम, वेअरहाऊस, लक्ष्मी टाकळी आण्णाभाऊ विद्यालय, यमाई-तुकाई तलाव परिसर, बिडारी बंगला अशा ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे़
-------------------
तीन बसस्थानके
शहरात एस. टी. येऊन वाहतूक ठप्प होऊ नये. कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागातील एस. टी. बससाठी चंद्रभागा बसस्थानक, मराठवाडा व सोलापूर विभागातील एस. टी. बससाठी मोहोळ रोडवर भीमा बसस्थानक व उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भातील एस. टी. बससाठी गुरसाळे येथे विठ्ठल बसस्थानक तयार करण्यात आले आहे.
--------------------------
अशी आहे अधिकाऱ्यांची संख्या
सहाय्यक पोलीस आयुक्त - २
पोलीस अधिकारी - २२
वाहतुक पोलीस अधिकारी - ३७०
पॉइंट - १००