सोलापूर शहरातील ९१ रस्ते होताहेत चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:07 PM2018-07-28T13:07:06+5:302018-07-28T13:10:56+5:30

कामे प्रगतिपथावर: २५ कोटी विशेष निधीतून हद्दवाढला फायदा

There are 9 1 roads in Solapur city | सोलापूर शहरातील ९१ रस्ते होताहेत चकाचक

सोलापूर शहरातील ९१ रस्ते होताहेत चकाचक

Next
ठळक मुद्देनिविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली पावसामुळे रस्तेकामांना अडथळाशहर व हद्दवाढ भागातील रस्त्यांची चकाकी वाढणार

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी निधीतून शहर व हद्दवाढ भागातील ९१ रस्ते चकचकीत बनविण्याच्या कामांनी वेग घेतला  आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे नियोजन करून शहर व हद्दवाढ भागातील ९१ रस्त्यांची कामे प्रस्तावित करून मनपा सभेकडे मंजुरीसाठी फाईल पाठवली होती. 

फेब्रुवारीमध्ये या कामांना मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्तेकामांना अडथळा आला तरी सूर्यप्रकाश असताना डांबरीकरणाची कामे पूर्ण केली जात आहेत. इतर वेळी रस्त्याची रुंदी वाढविणे, खडीकरण, खड्डे बुजवून रस्ता समतल करणे ही कामे पूर्ण करून घेतली जात आहेत. त्यामुळे रस्त्यांचा लूक बदलू लागला आहे.

 वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ७० टक्के हद्दवाढ व ३० टक्के शहरी भागातील आहेत. या कामांची टेंडर प्रक्रिया १७ भागात करण्यात आली. या कामांमुळे शहर व हद्दवाढ भागातील रस्त्यांची चकाकी वाढणार आहे. सध्या शहर आणि हद्दवाढ भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. जलवाहिनी, ड्रेनेजसाठी खोदाई व पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

 रस्त्यांचे मेन्टेनन्स करण्यासाठी मनपाकडे निधी नाही. झीरो बजेटमुळे मेन्टेनन्सची कामे थांबविली होती. या योजनेतून रस्ते झाल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शिवाय नागरिकांचा त्रास वाचणार आहे. ज्या रस्त्यांचे टेंडरिंग पूर्ण झाले त्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. 

हे रस्ते होणार चकाचक
- भारतीय चौक ते बाराईमाम चौक, दयानंद कॉलेज ते चिरागअली तकीया, भुलाभाई चौक, बारामोरी चौक ते शिकलगर वस्ती, इंद्रजित मेडिकल ते आसरा चौक, दावत हॉटेल चौक, डी-फॉर्मसी ते मीरानगर चौक, बॉम्बे पार्क ते सुभाषनगर, सहयोगनगर, डी-फॉर्मसी ते हायवे, मरिआई चौक ते सलगर वस्ती, गांधीनगर ते गुरुनानक चौक, अक्कलकोट रोड ते समाधाननगर, होटगी रोड इंडस्ट्रियलमधील रस्ते, श्रीशैलनगर ते दुलंगे घर, धोत्रीकर वस्ती, तांबे बोळ ते गवळी यांचे घर, सोनी बंगला ते भीमाई चौक, ढंगे रेसिडेन्सी, महालक्ष्मीनगर, लेंगरेनगर, बनशंकरीनगर, मित्रनगर, जयलक्ष्मीनगर, घोंगडे वस्तीतील रस्ते, जुना बोरामणी नाका ते दयानंद कॉलेज, गुरुवार पेठेतील रस्ते़

शुक्रवारपेठ मारुती मंदिर रस्ता, चंदनकाटा ते सागर चौक, किनारा हॉटेल ते फकिरा चौक, जुनी मिल कंपाउंडमधील डीपी रस्ता, वसंतविहार ते गिरीजानगर, वालचंद कॉलेज ते भावनाऋषी मंदिर, माधवनगर, आशानगर, सुनीलनगर, सिद्धेश्वरनगर, आदर्शनगर, गेंट्याल टॉकीज ते लोकसेवा हायस्कूल, मोहितेनगर ते विक्रीकर भवन, सोरेगाव आश्रम ते शाळा, स्वामी विवेकानंदनगर, नम्रता सोसायटी, ओम गर्जना चौक ते शिक्षक सोसायटी, प्रसादनगर, सैफुल ते रोहिणीनगर, राघवेंद्रनगर, जगदंबानगर, बॉम्बे पार्क ते रेणुकानगरी, इंडियन मॉडेल ते रेणुकानगर, हत्तुरे वस्ती मुख्य रस्ता, सुरवसेनगर, सिद्धेश्वनगर ते नई जिंदगी.

Web Title: There are 9 1 roads in Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.