उत्तर तालुका कोरोना रुग्णसंख्येत होतेय मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:46+5:302021-05-16T04:20:46+5:30
नान्नज येथील सेंट लुक्स दवाखान्यात उपचारासाठी मागील आठवड्यात बेड मिळत नव्हते. शनिवारी ३० पैकी १० बेड रिकामे (ऑक्सिजन व ...
नान्नज येथील सेंट लुक्स दवाखान्यात उपचारासाठी मागील आठवड्यात बेड मिळत नव्हते. शनिवारी ३० पैकी १० बेड रिकामे (ऑक्सिजन व साधे) असल्याचे सांगण्यात आले. येथून १०४ रुग्ण बरे होऊन गेल्याचे डाॅ. चित्तरंजन भोजने यांनी सांगितले. खेड येथील कोविड सेंटरमध्ये काॅरंटाइनची एप्रिल महिन्यात १८७ पर्यंत गेलेली संख्या १५ मे रोजी ७१ वर आली आहे.
चौकट
मदतीचा हात
नान्नज येथील युथ संकल्प फाउंडेशनच्या वतीने संभाजी दडे, योगेश गवळी, शैलेश गवळी, विजय गवळी व इतरांतर्फे सेंट लुक्समध्ये उपचार घेत असलेल्यांना व नातेवाइकांना सकाळी नाश्ता व सायंकाळचे जेवण देण्यात येत आहे. खेड येथील कोविड सेंटरमध्ये दररोज सकाळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद उकडलेली अंडी मोफत देतात. लोकमंगल कारखान्याच्या वतीने बीबी दारफळ येथे १५०० कुटुंबांना मोफत सॅनिटायझर बाटल्या, सचिन साठे यांनी एक हजार मास्कचे वाटप केले.
--