मनाशिवाय दुसरे दैवत नाही ।
By appasaheb.patil | Published: December 15, 2018 09:25 PM2018-12-15T21:25:53+5:302018-12-15T21:27:58+5:30
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।। मनें ...
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली । मना माउली सकळांची ।।
मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आन दैवत । "तुका" म्हणे दुसरें ।।
संत तुकाराम
अर्थ :- मन प्रसन्न ठेवा,सर्व सिद्धीचें कारण काय ते मन ,त्याप्रमाणे असिद्धीचें कारणही मनच. मोक्ष किंवा बंधन,सुख,समाधान,किंवा इच्छा,हावरेपणा, हे सर्व मनामुळे घडते. देवाच्या प्रतिमा करणारे तेही मनच त्याचप्रमाणे मनाची पूजा करणारे तेही मनच. इच्छा पुरविणारे मनच. त्याचप्रमाणे सगळ्यांचे कारण,माउली, मनच. गुरु आणि शिष्य हे प्रकार मनानेच मन आपलेच दास्य आपण कर्तो. आपले आपल्यालाच प्रसन्न होते किंवा अप्रसन्न हि होतें . चांगल्या गतीला किंवा वाईट गतीला कारण मनच. हे साधकांनो ,वाचकांनो , पंडितानो , श्रोतेहो, वक्तेहो, सांगतो ऐका, मनाशिवाय दुसरे दैवत नाहीं .