दसरा काढला धुवायला अन् पाणी नाही नळाला; हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 08:50 AM2020-10-16T08:50:20+5:302020-10-16T08:50:56+5:30

सोलापूर शहरातील समस्या; टाकळी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने समस्या

There is no running water for washing Dussehra; Disruption of water supply in border areas | दसरा काढला धुवायला अन् पाणी नाही नळाला; हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय

दसरा काढला धुवायला अन् पाणी नाही नळाला; हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय

googlenewsNext

सोलापूर : गेले तीन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी सकाळी उघडीप दिल्याचे दिसताच हद्दवाढ भागातील नागरिकांनी दसरा धुवायला काढला अन् अचानक नळाचे पाणी गेले. त्यामुळे सकाळीच पाण्यासाठी घराघरात धावपळ उडाली आहे.


गेले तीन दिवस सोलापुरात पावसाची संततधार होती दसरा सणाच्या तोंडावर सूर्यदर्शन न झाल्याने नागरिकांना घरातील कपडे धुण्याची अडचण झाली होती. शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्याचे दिसताच सर्वांनी दसरा धरायला काढला. घराघरातून ही लगबग सुरू असतानाच अचानक नळाचे पाणी गेले, त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा फोन खणखणू लागला जुळे सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी पंपग्रहाचा वीजपुरवठा पहाटे साडेपाचपासून खंडित झाला आहे. त्यामुळे पुरेसा पाण्याचा उपसा होऊ न शकल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर नागरिकांना पाणी मिळणार आहे.

पावसाने शहरात सगळीकडे मोकळ्या जागेत जलाशय साठली आहेत. अतिवृष्टी झाल्याने शहराजवळच्या सीना व भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत, पण आज दसरा सणाच्या तोंडावर नळाचे पाणी गेल्याने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Web Title: There is no running water for washing Dussehra; Disruption of water supply in border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.