पळा पळा अपघात झाला, तिघांचा जीव गेला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:01+5:302021-02-08T04:20:01+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर, नॅशनल हायवे व येथील ओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला. रस्ते ...
उपप्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर, नॅशनल हायवे व येथील ओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला. रस्ते सुरक्षा सप्ताहऐवजी यावर्षी १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी एक महिन्याचा कालावधी रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह म्हणून घोषित केला आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट परिवहन विभाग तसेच नॅशनल हायवे डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने निवड केलेल्या ओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येेत आहेेेत.
७ रोजी येथील शिवाजी चौकात आपल्या बेजबादारपणामुळे झालेल्या अपघातानंतर परिवारावर ओढवलेल्या प्रसगांचे वास्तव दाखविणारी अपघात ही एक लघुनाटिका सोलापूर येथील भारती विद्यापीठ व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करा, व्यसनापासून दूर रहा, मोबाईलवर बोलत गाडी चालवू नका असा संदेश दिला.
या लघु नाटिकेमध्ये आशुतोष नाटकर, किशोर शेरखाने, सुहास सुरवसे, श्रीनिवास जोशी, प्रसाद बळवंतराव, प्रसन्न मुनोळी, विनायक लोंढे, प्रज्ञा माने, भक्ती सिरसाट, नीलम रनखांबे, पूनम शिंदे, अदिती माने, सांजी नाटकर यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे सचिन गलांडे, सागर ढोरे पाटील, रवींद्र माळी, ओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभय बंडगर , येथील वाहतुक शाखेचे सूर्यकांत जाधव, सतीश पवार उपस्थित होते.
रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी प्रबोधन
ओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रस्ते सुरक्षा विषयांवर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, मोफत नेत्रतपासणी, रस्ते वाहतुकीसंदर्भात प्रचलित कायद्याचे मार्गदर्शन, रस्ते वाहतूकसंदर्भात पथनाट्ये व रस्ते सुरक्षाबद्दल प्रबोधन करणे आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
फाेटो
०७मोहोळ -पथनाट्य
ओळी
रस्त वाहतूक सुरक्षेअंतर्गत पथनाट्याद्वारे प्रबोधन करताना सोलापुरातील विद्यार्थी.