मुख्य प्रवेशद्वाराजवळील धोकादायक खड्डा बुजविण्यास मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:27 AM2021-09-09T04:27:50+5:302021-09-09T04:27:50+5:30
मंगळवेढा बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा अनेक दिवसांपासून आहे. या खड्ड्याकडे आत्तापर्यंत एस.टी.च्या कुठल्याही ...
मंगळवेढा बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा अनेक दिवसांपासून आहे. या खड्ड्याकडे आत्तापर्यंत एस.टी.च्या कुठल्याही अधिकाऱ्याचे लक्ष न गेल्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांसाठी तो जाचक ठरत आहे. या खड्ड्यात अडीच ते तीन फूट पाणी साचून राहिल्याने प्रवाशांना आत येताना व बाहेर जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. मोटारसायकलवरून येणारे तीन ते चार प्रवासी या खड्ड्यात पडले आहेत.
सध्या पावसाळ्यामुळे डेंग्यू, चिकनगुनियाची साथ आल्याने हा खड्डा म्हणजे साथीला आमंत्रण असल्याची चर्चा सभोवतालचे व्यावसायिक करीत आहेत. बस स्थानक परिसरातील डांबरीकरण करताना हा खड्डा बुजविणे अपेक्षित होते. मात्र तो बुजविला नसल्याने अद्यापही जैसे थे स्थितीत आहे. या प्रवेशद्वारातून मंगळवेढा आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या बाहेर पडत असतात.
ओळी :::::::::::::::::
मंगळवेढा बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील हाच तो धोकादायक खड्डा.
080921\img-20210908-wa0023-01.jpeg
ओळी -मंगळवेढा बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ हाच तो धोकादायक खड्डा छायाचित्रात दिसत आहे.