आली लग्नघटिका समीप...

By admin | Published: May 24, 2014 01:19 AM2014-05-24T01:19:12+5:302014-05-24T01:19:12+5:30

लोकमतचा उपक्रम: पाच अंध जोडप्यांचा आज दिमाखदार लग्न सोहळा

There was a wedding vestibule ... | आली लग्नघटिका समीप...

आली लग्नघटिका समीप...

Next

सोलापूर: गेले चार दिवस चर्चेचा विषय ठरलेला अन् सोलापूरकरांच्या उत्सुकतेचा तो दिवस अखेर आज उगवला. ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राबविलेल्या पाच अंध बांधवांच्या विवाह सोहळ्याची घटिका समीप आली आहे. २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजून २ मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर बालाजी सरोवरच्या सभागृहात डोळ्यांचे पारणे फेडणारा हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. या आगळ्यावेगळ्या लगीनघाईने गेले चार दिवस लोकमत कार्यालयात एकच धांदल उडाली होती. ‘चला लग्नाला’ या सदराच्या समारोपाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने दमाणी अंधशाळा व नॅब (दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा सोलापूर) या संस्थांच्या माध्यमातून पाच अंध जोडप्यांचा विवाह करण्याचे योजिले आहे. वºहाडी मंडळी शनिवारी सकाळी सोलापुरात या दोन्ही शाळांमध्ये दाखल होणार आहेत. दोन्ही शाळांमध्ये हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यानंतर दुपारी चार वाजता सर्व वºहाडींचे एसएमटीच्या बसमधून लोकमत कार्यालयात आगमन होईल. तेथून सवाद्य वरात निघणार आहे. बालाजी सरोवर हॉटेलच्या सभागृहात वरात पोहोचल्यानंतर विधिवत अक्षता सोहळा होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कन्यादान होणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे, रोटरी क्लब आॅफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरुरतन दमाणी अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी, दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे प्रकाश यलगुलवार यांनी केले आहे.

-------------------------

हायटेक निमंत्रण ‘आस्क मी’ चे राहुल शेटे यांनी मोबाईलवर व्हाईस कॉल पाठवून या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्याची हायटेक व्यवस्था केली. याशिवाय हा सोहळा दिमाखदार होण्यासाठी बी. आर. अ‍ॅड्सचे राकेश माखिजा, भाग्यलक्ष्मी मंडपचे शावरप्पा वाघमारे, श्री लक्ष्मी मंडपचे कासे, राजाभाऊ शेजाळ, सचिन साऊंड अ‍ॅन्ड लाईटचे नितीन गायकवाड, डॅनीश केक अ‍ॅन्ड फ्लॉवर्सचे धनंजय झुंझुर्डे, साई डिजिटलचे अंबादास तडेपागूल यांनी मदत केली आहे.

---------------------------

कन्यादानाचे मानकरी... पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार दिलीप माने, ह.भ.प. जयवंत बोधले महाराज, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, बालाजी सरोवरचे संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते कन्यादान करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे स्वागत वरात बालाजी सरोवरमध्ये पोहोचल्यावर पोलीस बॅन्ड पथकातर्फे वºहाडींचे स्वागत करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीतून लोकमतने राबविलेल्या या आगळ्या उपक्रमासाठी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी विशेष बाब म्हणून पोलीस बॅन्ड उपलब्ध केला आहे. हे ठरणार आकर्षण तिरुपतीचा लाडू, एसएमटीची सेवा, प्रतिज स्पॉलोनमध्ये हेअर स्टायलिश व अ‍ॅस्थेटिशीयन प्रतिभा पावस्कर—पवार यांच्यातर्फे वधूंना मेकअप, लोकमत कार्यालयापासून सवाद्य वरात, एम. ए. पटेल यांची आतषबाजी,पोलीस बॅन्ड पथकाची धून, मान्यवरांच्या हस्ते कन्यादान हे आकर्षण ठरणार आहे.

 

Web Title: There was a wedding vestibule ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.