जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:42+5:302021-05-21T04:23:42+5:30

२२ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील पाणी ‘सांडपाणी’ या गोंडस शब्दाचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली ...

There will be a bomb agitation in front of the Water Resources Minister's house | जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार

जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार

Next

२२ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील पाणी ‘सांडपाणी’ या गोंडस शब्दाचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी नेते आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने या विषयावर जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला होता. मात्र जलसंपदा मंत्री पाटील यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही.

यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापु मेटकरी, सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे, बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

Web Title: There will be a bomb agitation in front of the Water Resources Minister's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.