शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:03+5:302021-08-24T04:27:03+5:30

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ...

They push the farmers forward, the pressure of the leaders behind them, tell me how to do the work? | शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

Next

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ऐकून शेतकरीही भूसंपादनाला विरोध करीत आहेत. त्यामुळे मुदतीत काम होत नाही. आडकाठी आणणाऱ्यांना आवरा आणि सहकार्याची भावना ठेवा, अशी मागणी अधिकाऱ्यांमधून होत आहे.

महामार्गाच्या कामांमध्ये काही शिवसैनिक अडथळा आणत आहेत. त्यांना समज द्या, असे पत्र केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्यभरातील महामार्गांच्या कामांत येत असलेल्या अडचणी समोर येऊ लागल्या. सोलापुरात सध्या तीन महामार्गांची कामे सुरू आहेत. त्यातील सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामात अडथळे येत आहेत. कामती बु., खुपसंगी, आंधळगाव या ठिकाणी कामे रखडली आहेत. सततच्या अडथळ्यामुळे एकही रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही. त्यांना आता डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

............

सोलापूर-विजयपूर

या ११० किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प १५७६ कोटींचा असून भूसंपादनासाठी २५० कोटी गेले आहेत. ९४.५६ किलोमीटरचा रस्ता झालेला आहे.

..........

सोलापूर-अक्कलकोट

या ३८ किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ८०७ कोटींचा असून, भूसंपादनासाठी १९८ कोटी दिले आहेत. ३३ किलाेमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे. सोलापूर शहरातील काही भाग संपादित न झाल्याने काम थांबले आहे.

.........

सोलापूर-सांगली

हा १६६ किलोमीटरचा प्रकल्प असून सोलापूर ते मंगळवेढा, मंगळवेढा ते वाटंबरे, वाटंबरे ते बोरगाव असे विभाजन करून काम सुरू आहे. तीन हजार कोटींचा हा प्रकल्प असून मे २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. १५४ किलोमीटर रस्त्यांपैकी १४० किलाेमीटरचा रस्ता झालेला आहे.

......

माउलीच्या मार्गातही अडथळा

पंढरपूर ते आळंदी हा ज्ञानेश्वर पालखी महामार्ग एकूण १९५ किलोमीटरचा रस्ता आहे. सोलापूर जिल्ह्यातून ११९ किलोमीटरचा रस्ता जातो. डिसेंबर २०२० मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालेले आहे. १२०० कोटींचा प्रकल्प आहे. माळशिरस बाह्यवळण रस्त्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी रस्ता अडवला आहे.

..................

राजकारणी काय म्हणतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना समज देणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी एका अभियंत्याच्या कामावर चिखलफेक केली. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनाही त्यांनी समज द्यावी.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

........

सोलापूर जिल्ह्यातील कामांबाबत कुठे तक्रार नाही. अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांना मोबदलाही चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ओरडही नाही. राष्ट्रवादीकडून तरी कुठेही अडवणूक होत नाही.

- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

......

महामार्गाच्या कामांमध्ये कोणीही अडवणूक करीत नाही. माळशिरस तालुक्यात ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या विषय मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यात राजकीय लोकांचा संबंध येत नाही.

- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

Web Title: They push the farmers forward, the pressure of the leaders behind them, tell me how to do the work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.