चोरट्यांने वकिलाचे कार्यालय फोडले; चार हजार रुपये चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:21+5:302021-08-22T04:26:21+5:30
नवी लोटेवाडी (ता. सांगोला) येथील ॲड. शंकर भगवान सरगर यांचे सांगोला न्यायालय परिसरातील नगरपालिका गाळा नं. ११ मध्ये कार्यालय ...
नवी लोटेवाडी (ता. सांगोला) येथील ॲड. शंकर भगवान सरगर यांचे सांगोला न्यायालय परिसरातील नगरपालिका गाळा नं. ११ मध्ये कार्यालय आहे. ते सांगोला न्यायालय व पंढरपूर येथील सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात. १७ ऑगस्टला कार्यालय उघडून न्यायालयातील केसचे कामकाज पाहून सायंकाळी घरी परतले.
दरम्यान, १८ ऑगस्टला पहाटे कार्यालयाच्या शटरची पट्टी उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. केबिनच्या दरवाजाचे लॉक तोडून केसच्या फाईल्स, कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून देऊन ड्राॅवरचे लाॅक तोडून रोख चार हजार रुपये घेऊन पोबारा केला. सकाळी कार्यालयाशेजारील गोपाळ चांडोले यांनी ॲड. शंकर सरगर यांना फोनवरून तुमच्या कार्यालयाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगोल्यात येऊन कार्यालयाची पाहणी केली. याबाबत ॲड. शंकर सरगर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
----