ओळख लपविण्यासाठी चोरांना धर्म बदलला, ७३ ग्रॅम सोने जप्त, सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:10 PM2017-12-16T14:10:47+5:302017-12-16T14:15:03+5:30

कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़

Thieves changed religion to hide identity, 73 grams of gold seized, Solapur city crime branch action | ओळख लपविण्यासाठी चोरांना धर्म बदलला, ७३ ग्रॅम सोने जप्त, सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई

ओळख लपविण्यासाठी चोरांना धर्म बदलला, ७३ ग्रॅम सोने जप्त, सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्देही कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली़ विठ्ठल चंद्रशेखर मादर उर्फ सध्या युसूफ चाँदसाब शेख (वय २८,रा. भारत नगर कुमठा नाका ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव


अमित सोमवंशी
सोलापूर दि १६ : कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ शहरातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले़ दरम्यान, त्याच्याकडून ७३ ग्रॅम सोन्यांचे दागिने जप्त केले़ ही कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी केली़
अट्टल गुन्हेगार विठ्ठल चंद्रशेखर मादर उर्फ सध्या युसूफ चाँदसाब शेख (वय २८,रा. भारत नगर कुमठा नाका ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शहर हद्दीतील मालाविषयी गुन्ह्यांना आळा घालणे व रेकार्डवरील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करतांना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी व त्यांच्या पथकाला गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने अट्टल गुन्हेगार विठ्ठल यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने व त्याच्या साथीदाराने एमआयडीसी पोलीस ठाणे व विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्यांचे दागिने जप्त केले. त्याची किमत १ लाख ८१ हजार २५० रुपये आहे. आरोपी विठ्ठल याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी सांगितले.
---------------
दिवसा भंगरचा व्यवसाय अन रात्री चोरी
आरोपी विठ्ठल याला २००८ साली विजापूर नाका पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. तो सराईत गुन्हेगार होता. तो मुळचा विजापूरचा रहिवाशी असून त्यांने मागील पाच वर्षाखाली त्याचे नाव बदलुन तो सोलापूरात राहुन भंगारचा व्यवसाय करायचा आणि रात्रीच्या वेळी    घरफोडया करत असल्याचे गुन्हे शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
-----------------
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त महादेव तांबडे , पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यंकात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी, पोकॉ. सचिन बाबर, राजेश चव्हाण, नाना उबाळे, शितल शिवशरण, मंजुनाथ मुत्तनवार, सागर गुंड, दत्तात्रय कोळेकर, राजू राठोड, विजय निबांळकर आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Thieves changed religion to hide identity, 73 grams of gold seized, Solapur city crime branch action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.