मोटारसायकलवरील चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून महिलेस पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:11+5:302021-08-23T04:25:11+5:30

टेंभुर्णी : रक्षाबंधनासाठी नातेवाईकांसोबत मोटारसायकलवरून माहेरी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील ४२ हजाराचे मणीमंगळसूत्र तोडून घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. केवळ अर्ध्या ...

Thieves on motorcycles snatched Mangalsutra and knocked down the woman | मोटारसायकलवरील चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून महिलेस पाडले

मोटारसायकलवरील चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून महिलेस पाडले

googlenewsNext

टेंभुर्णी : रक्षाबंधनासाठी नातेवाईकांसोबत मोटारसायकलवरून माहेरी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील ४२ हजाराचे मणीमंगळसूत्र तोडून घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. केवळ अर्ध्या तासाच्या फरकाने मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हा प्रताप केला असून रविवारी दुपारी १२ च्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी अशा दोन घटना घडल्या.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार शिवलाल आलदर (रा. बादलेवाडी) हे पत्नी दीपाली व मेहुणी सारिका मारकड यांना मोटारसायकलवर बसवून करकंब येथे रक्षाबंधन सणासाठी निघाले होते. दुपारी १ वाजता सुमारास ते टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील परिते हद्दीतील हॉटेल आकाशजवळ आले असता, मागून भरधाव वेगात आलेल्या एका मोटारसायकलवरील दोघांपैकी एका चोरट्याने सारिका मारकड यांच्या गळ्यातील २७ हजारांचे मणीमंगळसूत्र व मिनी गंठण हिसका मारून तोडून पोबारा केला. यावेळी सारिका मारकड या खाली पडल्याने डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर पंढरपूर येथे उपचार चालू आहेत. याबाबतची फिर्याद शिवलाल आलदर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे.

या घटनेच्या अगोदर १२ वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी कुर्डूवाडी रोडवरील तांबवे पाटीजवळ पिंपळनेर येथील भारती बाळासाहेब घाडगे या भावासोबत मोटारसायकलवरून वेणेगावकडे निघाल्या होत्या. तेव्हा त्यांच्याही गळ्यातील १५ हजारांचे सोन्याचे गंठण याच चोरट्यांनी तोडून नेले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. काशीद हे करीत आहेत.

Web Title: Thieves on motorcycles snatched Mangalsutra and knocked down the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.