हयात नसलेल्यांबाबत विचार करून बोला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:46+5:302021-04-05T04:19:46+5:30
यावेळी भगीरथ भालके यांनी पंढरपूरच्या काही परंपरांचा दाखला देत निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर राखण्याचे आवाहन केले. भविष्यात प्रचार आणखी जोमात ...
यावेळी भगीरथ भालके यांनी पंढरपूरच्या काही परंपरांचा दाखला देत निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर राखण्याचे आवाहन केले. भविष्यात प्रचार आणखी जोमात होणार असल्याने कोण काय बोलते, याला उत्तरे कशा प्रकारे दिली जातात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.
शैला गोडसे, सचिन शिंदे
यांच्याकडून कारखानदार टार्गेट
प्रमुख पक्ष असलेल्या महाविकास आघाडी, भाजपाकडून एकमेकांवर टीका सुरू असताना शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे या स्वत:विरोधी दोन्ही साखर करखानदारांवर शेतकरी, कामगार, मजुरांची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप करत त्यांना वठणीवर आणण्यासाठीच आपण मैदानात असल्याचे सांगत आहेत, तर स्वाभिमानीचे सचिन शिंदे-पाटील वीज, पाणी, थकीत ऊस बिले, कामगारांचे प्रश्न जनतेसमोर मांडून साखर कारखानदारांना टार्गेट करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचेही मनोरंजन होत आहे.