ज्वारी उत्पादनात घनश्याम गरड विभागात तिसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:15 AM2021-07-02T04:15:50+5:302021-07-02T04:15:50+5:30
सोलापूर : ज्वारीचे हेक्टरी ६१ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या रानमसले येथील घनश्याम जयसिंग गरड यांचा पुणे विभागात तृतीय क्रमांक ...
सोलापूर : ज्वारीचे हेक्टरी ६१ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या रानमसले येथील घनश्याम जयसिंग गरड यांचा पुणे विभागात तृतीय क्रमांक आला. गुळवंचीचे दादासाहेब भोसले (गहू), हिरजचे मिनाज पटेल (हरभरा) व देगावचे सिद्धेश्वर कस्तुरे (ज्वारी) उत्पादनात उत्तर तालुक्यात प्रथम आले. या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ कार्यक्रमात सभापती रजनी भडकुंबे व तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रब्बी ज्वारी उत्पादनात सिद्धेश्वर कस्तुरे (हेक्टरी ४१ क्विंटल), सुहास लामकाने (अकोलेकाटी, हेक्टरी ४० क्विंटल), प्रशांत शिंदे (पाकणी, हे. ३७ क्विंटल), गहू उत्पादनात दादासाहेब भोसले (हे. ५५ क्विंटल), किशोर शिंदे (पाकणी, हे. ३९ क्विंटल), सुनील पाटील (पाकणी, हे. ३७ क्विंटल), हरभरा उत्पादनात मिनाज पटेल (हेक्टरी २७ क्विंटल), रामेश्वर तिवाडी (पाकणी, हे. २६ क्विंटल), राजू निळे (हिरज, हेक्टरी २४ क्विंटल) व विभागात तृतीय आलेल्या घनश्याम गरड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी अधिकारी रामचंद्र साबळे, सुरेश राठोड, अमोल कांबळे, गजानन माने, राजेश देशपांडे, शंकर पाथरवट, अमोल तोडकरी उपस्थित होते.