तिसºया वेतन आयोगासाठी सोलापूर जिल्ह्यातील बीएसएनएल कर्मचाºयांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:40 PM2017-12-13T15:40:18+5:302017-12-13T15:41:39+5:30
तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे. बाळीवेस येथील मुख्यालयासमोर या कर्मचाºयांनी काही काळ धरणे आंदोलन केले.
दिल्ली येथील बीएसएनएलच्या सर्व संघटना आणि असोसिएशनच्या वतीने हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बीएसएनएलईयु, एनएफटीई (बीएसएनएल), एसएनई, एआयबीएसएनएल, एमईडब्ल्यूए आणि एआयजीओ या संघटनांचा सहभाग आहे. जवळपास सर्वच संघटनांचे प्रतिनिधी या संपात सहभागी झाले असून, ४८० अधिकारी आणि कर्मचाºयांचा यात सहभाग आहे. ४८ तास हा संप चालणार असून, बुधवारी मध्यरात्री त्याची समाप्ती होईल. यावेळी एम.ए. बिराजदार, डी.एस. सुरवसे, सिद्धगणेश, गपाट आदी पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.