चिखलठाण येथे बिबट्याने घेतला पुन्हा तिसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:41+5:302020-12-08T04:19:41+5:30
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अरचंद कोडली हा ऊस तोडण्यासाठी बारामती ॲग्रो साखर कारखान्याकडे आला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ...
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अरचंद कोडली हा ऊस तोडण्यासाठी बारामती ॲग्रो साखर कारखान्याकडे आला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या लाडाहिरा भागातील ऊसाच्या फडात धुळे जिल्ह्यातील दुसानी येथील अरचंद कोडली व त्यांच्या सहकाऱ्यांची टोळी सोमवारी ऊस तोडण्याचे काम करत होती. ऊसतोड कामगारांसोबतच जरचंद यांची फुलाबाई नावाची नऊ वर्षांची मुलगी खेळत होती. अचानक दहा-साडेदहाच्या दरम्यान ऊसात असलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला व तिला जबड्यात धरून फरफटत चालविले असता, ती मोठ्याने ओरडल्यावर ऊस तोडणाऱ्या सर्व मजुरांनी कोयता व काठ्याने बिबट्याकडे धाव घेतली.
ही घटना समजताच माजी आमदार नारायण पाटील, उप-सभापती दत्ता सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, सरपंच चंद्रकांत सरडे, तहसीलदार समीर माने, वन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, पोलीस नाईक अनिल निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने करमाळा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सायंकाळी राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षण काकोडकर यांनी बिबट्यास ठार मारण्याची परवानगी दिली आहे.
अन् बिबट्याने जबड्यातून मुलीला बांधावर सोडले!
मुलीच्या ओरडण्याने ऊस कामगारांच्या पाठलागामुळे बिबट्याने जबड्यात पकडलेल्या मुलीस बांधावर सोडून ऊसाच्या फडात धूम ठोकली. त्यानंतर त्या मुलीला तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले