भाजपाच्या या नेत्याने केला ठाकरे सेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंनी बांधले शिवबंधन
By Appasaheb.patil | Published: November 9, 2022 06:00 PM2022-11-09T18:00:35+5:302022-11-09T18:01:43+5:30
सोलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी ठाकरे सेनेत प्रवेश केला.
सोलापूर : सोलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी ठाकरे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बुधवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. मंगळवारी रात्री ते सोलापुरात दाखल झाले. रात्रभर ते एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर बुधवारी सकाळी ते सांगोल्याकडे जाण्यासाठी निघाले असताना हॉटेलमध्येच एका छोटेखानी कार्यक्रमात संतोष केंगनाळकर यांना शिवबंधन बांधून आदित्य ठाकरेंनी पक्षप्रवेश दिला.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे, उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, राजु बिराजदार, भाजपचे दक्षिण पश्चिम मंडल उपाध्यक्ष सचिन चौगुले, संतोष माळी, संगमेश्वर बिराजदार, विठ्ठल संगोळगी, यल्रप्पा कोळी, शिवा रामपुरे, सिध्दाराम कुठेकर, शिवा बगले, प्रदिप जाधव, अजय लुटटे, उदय वळसंगे, केदार तमगोंडा, राजकुमार गुणापुरे, संतोष रत्नाकर, बसु कोळी, मल्लु पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.