Uddhav Thackeray: ठाकरेंप्रती 'शिंदें'ची उत्तम निष्ठा; सोलापूर ते मुंबई पायी आलेल्या शिवसैनिकाचं मातोश्रीवर स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:31 PM2022-08-05T14:31:05+5:302022-08-05T14:33:23+5:30

सोलापुरातील उळे येथे राहणारे उत्तम शिंदे हे लहानपणापासून शिवसैनिक आहेत.

This is the best loyalty... Shivsainik 'Shinde' met Uddhav Thackeray after a 15-day journey on foot from solapur to mumbai | Uddhav Thackeray: ठाकरेंप्रती 'शिंदें'ची उत्तम निष्ठा; सोलापूर ते मुंबई पायी आलेल्या शिवसैनिकाचं मातोश्रीवर स्वागत

Uddhav Thackeray: ठाकरेंप्रती 'शिंदें'ची उत्तम निष्ठा; सोलापूर ते मुंबई पायी आलेल्या शिवसैनिकाचं मातोश्रीवर स्वागत

googlenewsNext

सोलापूरसोलापूरहून पायी निघालेल्या शिवसैनिकाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. उत्तम शिंदे  हे ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी आले होते. बाळासाहेबांनी 'प्रति दादा कोंडके'अशी उत्तम शिंदे यांना संबोधले होते. २१ जुलै रोजी सोलापूरहून निघालेले शिंदे ३ ऑगस्टला मुंबईत पोहोचले. शुक्रवारी मातोश्रीवर 'देव'दर्शन झाल्याची भावनाच त्यांनी लोकमत शी बोलताना ाबोलून दाखविली.

सोलापुरातील उळे येथे राहणारे उत्तम शिंदे हे लहानपणापासून शिवसैनिक आहेत. त्यांना प्रति दादा कोंडके म्हणून ओळखलं जातं. शिवसेनेच्या अनेक प्रचार सभामध्ये देखील उत्तम शिंदे दादा कोंडके यांच्या वेशात अनेक वेळा सहभागी झाले आहेत. अनेक वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं ती शिवसेना दुभंगलेली पाहून मनाला वेदना होतात. सर्वसामान्य शिवसैनिकाची देखील हीच भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्रित आले पाहिजेत. अशी प्रार्थना करण्यासाठी उत्तम शिंदे यांनी सोलापूर ते मुंबई असा पायी प्रवास पूर्ण केला. 

स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ तमाम शिवसैनिकांसाठी प्रती पंढरपूरच आहे. या स्मृतीस्थळरुपी पंढरीत पोहोचल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर तमाम शिवसैनिकांचा प्रतिनिधी म्हणून मी शिवसेनेच्या अखंडतेसाठी साकडं  घातल्याचं उत्तम शिंदे यांनी सांगितले. उत्तम शिंदे हे विधानसभा, लोकसभा अथवा ग्रामीण पातळीवरील निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार करतात. यासाठी ते दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांची भूमिका बजावून मतदारांना आकर्षित करतात. हाच अवलिया ठाकरेंची भेट घेण्यासाठी तब्बल १४ दिवसांचा पायी प्रवास करुन सोलापूरहून मुंबईला आला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही त्यांची भेट आस्थेवाईकपणे चौकशी केल्याचे सांगितले.

Web Title: This is the best loyalty... Shivsainik 'Shinde' met Uddhav Thackeray after a 15-day journey on foot from solapur to mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.