मेंढरामागचं पोर निघालं लै थोर; आयईएसमध्ये मिळविली २१वी रँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:24 AM2021-04-28T04:24:09+5:302021-04-28T04:24:09+5:30

लोटेवाडी येथील आबा लवटे यांना पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेण्याबरोबरच पारंपरिक व्यवसाय म्हणून मेंढरंही राखावी लागत होती. त्यामुळे आबाचा ...

Thor took out the pore behind the sheep; Ranked 21st in IES | मेंढरामागचं पोर निघालं लै थोर; आयईएसमध्ये मिळविली २१वी रँक

मेंढरामागचं पोर निघालं लै थोर; आयईएसमध्ये मिळविली २१वी रँक

Next

लोटेवाडी येथील आबा लवटे यांना पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेण्याबरोबरच पारंपरिक व्यवसाय म्हणून मेंढरंही राखावी लागत होती. त्यामुळे आबाचा शिक्षणाकडे ओढा कमीच होता. त्याचे १ ली ते ४ थीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. आई–वडील ऊसतोडीही करायचे. त्यामुळे आबाला ६ महिने आई-वडिलांसोबत ऊसतोडी करण्यासाठी जावे लागायचे आणि उर्वरित काळात जमेल तशी शाळा शिकायची असा त्याच्या प्राथमिक शाळेचा प्रवास होता.

५ वी ते १० वीपर्यंत, न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी या शाळेत शिक्षण झाले. १० वीच्या परीक्षेत त्याला ७३.५३ टक्के गुण मिळाले. ११वीला आटपाडी येथील आबासाहेब खेबुडकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी दररोज लोटेवाडी ते आटपाडी असा १२ कि.मी.चा प्रवास सायकलवरून करावा लागत असे. त्यावेळी ट्युशनअभावी आबा ११वी सायन्सला गणित विषयात नापास झाला. ट्युशनशिवाय अभ्यास करीत १२वी सायन्सला ७१ टक्के गुण मिळाले. या मार्कांच्या जोरावर त्याने बी.ई.साठी आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आष्टा येथे पूर्ण केले.

दरम्यान इंजिनिअरिंगमधील सर्वात मोठी पोस्ट म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अर्थातच आयईएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अभियांत्रिकी विभागाशी संबंधित अनेक खात्यांमध्ये नोकरीची संधी मिळते. म्हणून आबाने आयईएस होण्याचा चंग बांधला.

२०१६ ला आयईएसचा पहिला अटेंप्ट दिला. मात्र रिझल्ट फेल म्हणून आला. यानंतर २०१९ मध्ये आबाने पुन्हा एकदा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विविध खात्याच्या परीक्षाही दिल्या. तसेच गेटची परीक्षा २०१५, १६, १७, १८, १९, २०, २१ ला सलग सातवेळा उत्तीर्ण होण्याचा बहुमान आबाने मिळविला. इतकेच काय तर युजीसीची नेट परीक्षाही तो पास झाला. २०१९ ला आयईएसची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास केला. परंतु, दुर्दैवाने आबा पूर्व परीक्षा फेल झाला. त्यानंतर २०१९ ला गेट परीक्षेत ८१.३३ गुण मिळाले. २०१९ ला आयईएसच्या पूर्व परीक्षेचा त्याने प्रचंड अभ्यास केला. त्यामुळे २०२० ची आयईएसची पूर्व परीक्षा ते पास झाले. परंतु, मुख्य परीक्षेची तारीख जवळ येत असतानाच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे हा विषय रखडला.

२०२० मध्ये घरीच राहून पुढील परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दरम्यान डिसेंबर २०२० मध्ये बीएआरसीचा (भाभा अणुसंशोधन केंद्र) इंटरव्यू झाला आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधून आबा लवटे याची एकट्याचीच निवड झाली. ५ जानेवारीला निकाल लागला आणि १७ जानेवारी २०२१ला जॉयनिंग झाले. त्यामुळे यश आता पाठीमागे लागले होते. मार्च २०२१ मध्ये रखडलेला आयईएस परीक्षेसाठीचा इंटरव्यू होता. हा इंटरव्यू दिल्लीत होता. त्यामुळे आबाला दिल्लीला जावे लागणार होते. यानिमित्ताने आबाचा दिल्लीला पहिल्यांदा प्रवास झाला. इंटरव्यू एकदम व्यवस्थित पार पडला आणि १२ एप्रिल २०२१ ला आयईएसचा निकाल लागला. आबा लवटे देशपातळीवर २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

कोट :::::::::::::::

लहानपणी मेंढरं राखताना जे स्वप्न बघितले होते. आई-वडील व आपल्या गावाचे नाव करायचे, स्वतःचे कर्तृत्व जगासमोर सिद्द करायचे ते स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले.

- आबा लवटे

Web Title: Thor took out the pore behind the sheep; Ranked 21st in IES

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.