महात्मा गांधीजींचे विचार मानवजातीला तारणारे : डॉ. शाम लेंडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:21+5:302021-03-20T04:21:21+5:30
मंगळवेढा : महात्मा गांधीजींचे विचार २१ व्या शतकातसुध्दा मानवजातीला तारणारे आहेत. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ सर्वसमावेशक केली असल्याचे मत ...
मंगळवेढा : महात्मा गांधीजींचे विचार २१ व्या शतकातसुध्दा मानवजातीला तारणारे आहेत. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ सर्वसमावेशक केली असल्याचे मत रेणापूर (जि.लातूर) येथील शिवाजी महाविदयालयाचे डॉ.शाम लेंडवे यांनी व्यक्त केले.
संत दामाजी महाविदयालयात राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये डॉ. लेंडवे बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य प्रो. डॉ. एन. बी. पवार यांनी महात्मा गांधीजींच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्व विदयार्थ्यांना समजावे यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अशोक माने तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनी केले. आभार डॉ.राजेश गावकरे यांनी मानले.
---
१९ शाम लेंडवे