इतिहासाचे पुनर्लेखन करणारी विचारसरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:43+5:302021-08-18T04:28:43+5:30

समाजाबरोबर देशासाठीदेखील धोकादायक लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : अलीकडच्या काळात इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनर्वाचन करण्याचा विचार मांडला जात आहे. ...

Thoughts that rewrite history | इतिहासाचे पुनर्लेखन करणारी विचारसरणी

इतिहासाचे पुनर्लेखन करणारी विचारसरणी

Next

समाजाबरोबर देशासाठीदेखील धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : अलीकडच्या काळात इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनर्वाचन करण्याचा विचार मांडला जात आहे. ही विचारसरणी म्हणजे घडलेला इतिहास लपवण्याचा डाव आहे. स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा धोका यातून संभवतो, अशी भीती गांधीवादी विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केली.

मा. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात खोरे बोलत होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते डॉ. सतीश वळसंगकर (वैद्यकीय), डॉ. केशव सरगर (कृषी), प्रा. प्रबुद्धचंद्र झपके (शिक्षण) आणि एजाजहुसेन मुजावर (पत्रकारिता) यांना वि. गु. शिवदारे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना अरुण खोरे यांनी गांधीवादाचा पुरस्कार करीत प्रतिगामी विचारसरणी पुढे येताना इतिहासातील अनेक पान बाजूला टाकण्याची प्रवृत्ती बळावत असल्याचे सांगितले.

राजशेखर शिवदारे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्व. शिवदारे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा गौरव केला. धर्मराज काडादी, डॉ. बाहुबली दोशी यांनी विचार मांडले. कार्यक्रमास कुमार करजगी, नरेंद्र गंभिरे, प्रकाश वाले, सुभाष मुनाळे, श्रीशैल वाले, डॉ. चनगोंडा हाविनाळे, शिवानंद पाटील उपस्थिती होती.

शुभदा उपासे-शिवपुजे यांनी सूत्रसंचालन केले.

-------

माळ घालणं सोपं असतं....

माणसं अगदी सहजपणे गळ्यात माळ घालतात. माळ घालणं सोपं असतं. त्याच आचरण अवघड असत, याचं भान अनेकांना नसतं. आचरण शुद्ध ठेवा, असा सल्ला देताना गहिनीनाथ महाराजांनी राजकारण चांगलं असतं, पण माणसं त्याला घाणेरडं बनवतात. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी त्याच भान ठेवलं तर अशा राजकारणातून चांगला समाज घडेल ही अपेक्षा व्यक्त केली.

------

फोटो : १७ शिवदारे

वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. बाहुबली दोशी, धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, अरुण खोरे, गहिनीनाथ औसेकर महाराज, डॉ. सतीश वळसंगकर, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, डॉ. केशव सरगर आणि एजाजहुसेन मुजावर.

Web Title: Thoughts that rewrite history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.