पांडुरंगाला दीड हजार किलो फुलांची आरास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:45 AM2018-07-19T04:45:12+5:302018-07-19T04:45:31+5:30
यंदा आषाढीनिमित्त पांडुरंगाला तब्बल १८ प्रकारच्या रंगीबेरंगी दीड हजार किलो फुलांची आरास करणार असल्याची माहिती कारागीर भारत भुजबळ यांनी दिली़
- प्रभू पुजारी
पंढरपूर : यंदा आषाढीनिमित्त पांडुरंगाला तब्बल १८ प्रकारच्या रंगीबेरंगी दीड हजार किलो फुलांची आरास करणार असल्याची माहिती कारागीर भारत भुजबळ यांनी दिली़ आळंदीला साधारणत: ५०० किलो फुले लागतात तर आषाढीला पंढरपुरात सजावट करण्यासाठी तब्बल १५०० किलो फुले लागतात़ यासाठी एकादशीच्या पूर्वसंध्येला रात्रभर सजावट करण्याचे काम ४५ कारागीर सेवाभावी वृत्तीने करतात़ यामध्ये बंगालमधील १० कारागिरांचा समावेश आहे़ विविध प्रकारची देशी-विदेशी फुले वापरून ही सजावट केली जाते़ ती सजावट चार दिवस टिकून राहते़ यासाठी ही सर्व फुले पॅक करून बर्फामध्ये ठेवून पुण्यामधून वाहनातून पंढरपूरमध्ये आणतो, असे भुजबळ यांनी सांगितले़
या प्रकारच्या फुलांचा वापर
गुलाब, मोगरा, झेंडू, अष्टर, निशिगंधा, लिली, जरबेरा, कार्नेशन, लिली, ग्लॅडिओ, आॅरकेट, ड्रेसीना, शेवंती, अशोकाची पाने यासह
४ ते ५ विदेशी सुगंधी व रंगीबेरंगी फुले वापरून आकर्षक पद्धतीने आरास केली जाते़