गण गण गणात बोतेच्या जय घोषात हजारो भाविकांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन,सोरेगावच्या मंदिरात भाविकांची गर्दी
By Appasaheb.patil | Published: February 13, 2023 02:05 PM2023-02-13T14:05:57+5:302023-02-13T14:06:42+5:30
Solapur News: शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकटदिन सोरेगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकटदिन सोरेगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रीच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती.
दरम्यान, मंदिरात गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे व कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर यांनी श्रीं.च्या मुर्तीस दुग्धपंंच्यामृत महाअभिषेक व महारुद्र पुजा करण्यात आली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण, महाराजांची बावन्नी,अष्टक, २१ दुर्वांकुरानी पारायणची सांगता, शोभा साठे यांच्या हस्ते झाली. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त व भक्तगणांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वालास गोकाक, विजयकुमार रघोजी ,सुहास गुडपल्ली, तुकाराम जाधव नारायण जोशी तसेच महेश अक्कलकोट पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी वीरभद्र माळगे, अविनाश केतकर, तुकाराम सोनाळे, हेमंत परळिकर हेमंत वैद्य, मधुसूदन क्षिरसागर, मोहन भालवणकर,वर्षा भावार्थी, उज्वला खरात आधी जण उपस्थित होते.
सजावटीसाठी दोन टन फुलांचा वापर...
मंदिरात सुमारे दोन टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. पांढरा, केसरी, पिवळी जरबेरा, आँरकीड झेंडू , गुलाब आधी विविध फुलांचा वापर करून मोठ्या खुबीने सजावट करण्यात आली होती .त्यामुळे मंदिर व गाभाऱ्याला अधिक आकर्षकता प्राप्त झाली होती. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी संस्कार भारतीचे कलाकार अनंत देशपांडे व विनायक बोड्डू यांनी सभागृहात आकर्षक रांगोळी साकारली होती.