अक्कलकोट भाजीपाला बाजारात हजारोंची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:53+5:302021-04-14T04:19:53+5:30
तालुक्यातील लोक बाजारासाठी येथे सर्रास येत असतात. बाजार दोन आठवड्यांपासून बंद असले तरी भाजीपाला, किराणा, अशा अत्यावश्यक सेवा सुरू ...
तालुक्यातील लोक बाजारासाठी येथे सर्रास येत असतात. बाजार दोन आठवड्यांपासून बंद असले तरी भाजीपाला, किराणा, अशा अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने ‘आत ग्राहक, बाहेर नोकर’ हा पॅटर्न वापरून ग्राहकांची सोय केली जात आहे. यामुळे बाजारात एकच गर्दी दिसून येत आहे. याला रोखण्यासाठी ना नगरपालिका, ना पोलीस प्रशासन कोणीच गंभीर्याने घेताना दिसत नाही.
सोमवारी सकाळपासूनच जुना अडत बाजारात भाजीपाला व इतर साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली, तसेच स्टँडवर फळविक्रेते तर शनिवार, रविवार या दोन्ही दिवशी सुरू ठेवले होते.
एकंदरीत प्रशासन एकमेकांवर चालढकल करीत नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे.
----
गर्दी टाळण्यासाठी हे नियोजन करण्याची मागणी
भाजीपाला बाजार, जुना अडत बाजारात एकाच ठिकाणी ठेवू नका, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी आशा राऊत यांनी राबवलेल्या पॅटर्नमध्ये त्यावेळी शहरात चार ठिकाणी भाजीविक्री होत असे. यामुळे गर्दी कमी होण्यास व ज्या त्या भागातील लोकांची सोय होण्यास मदत होत होती. याबरोबरच फिरती भाजी, दूधविक्री होत असे. किराणा दुकान व डेअरीला वेळेची मर्यादा दिली होती. फळविक्री केवळ भाजीविक्री वेळेतच होत असे. यंदाही तसेच नियोजन नगरपालिकेने केल्यास सोयीचे होणार आहे.
----