समाजकल्याणच्या ७०० शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ दोन महिन्यांचा पगार थकीत

By admin | Published: May 9, 2014 07:27 PM2014-05-09T19:27:00+5:302014-05-09T23:51:36+5:30

सोलापूर : मागील दोन महिन्यांचा पगार थकीत असल्याने समाजकल्याणच्या शाळा आणि आश्रमशाळांतील जवळपास ७०० शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ पगार खात्यावर जमा व्हायला ट्रेझरीतून दिरंगाई होत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे़ मार्च आणि एप्रिल (२०१४) या दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे़ ऑनलाईन प्रक्रिया होऊनदेखील आज वेतन निघायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याच्या शिक्षक कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत़ जिल्‘ातील शाळांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील पगार हाती पडण्यात विलंबच लागतोय़

Thousands of social workers of 700 social workers were exhausted for two months | समाजकल्याणच्या ७०० शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ दोन महिन्यांचा पगार थकीत

समाजकल्याणच्या ७०० शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ दोन महिन्यांचा पगार थकीत

Next

सोलापूर : मागील दोन महिन्यांचा पगार थकीत असल्याने समाजकल्याणच्या शाळा आणि आश्रमशाळांतील जवळपास ७०० शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ पगार खात्यावर जमा व्हायला ट्रेझरीतून दिरंगाई होत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे़ मार्च आणि एप्रिल (२०१४) या दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे़ ऑनलाईन प्रक्रिया होऊनदेखील आज वेतन निघायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याच्या शिक्षक कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत़ जिल्‘ातील शाळांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील पगार हाती पडण्यात विलंबच लागतोय़
दोन महिने पगार थांबल्याने बहुसंख्य शिक्षकांनी यंदाची अक्षय्यतृतीया आंब्याविना साजरी केली आहे़ वेतन हाती लवकर पडत नसल्याने दूध बिल, घरभाडे थकल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत़

--------------------------------------------------------
समाजकल्याणकडून सर्व शिक्षकांची बिले मंजूर करुन ट्रेझरीत पाठवली आहेत़ ट्रेझरीत लवकरच मंजूर होऊ पाच दिवसांत त्यांच्या हाती वेतन पडेल़
- विवेक लिंगराज
अधीक्षक, समाजकल्याण

येत्या चार दिवसात समाजकल्याणच्या शिक्षकांना थकीत दोन महिन्यांचे वेतन हाती न पडल्यास समाजकल्याण कार्यालयासमोरच अर्धनग्न अवस्थेत भीक मांगो आंदोलन करणार आहोत़
- महेश हणमे
सामाजिक कार्यकर्ते़

Web Title: Thousands of social workers of 700 social workers were exhausted for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.