शेतकऱ्यास धमकी: आमदार नारायण पाटील यांच्याविरूध्द पोलीसात तक्रार

By admin | Published: April 1, 2017 03:07 PM2017-04-01T15:07:08+5:302017-04-01T15:07:08+5:30

solapur,narayan, patil,agri,

Threat to the farmer: Complaint against policeman Narayan Patil | शेतकऱ्यास धमकी: आमदार नारायण पाटील यांच्याविरूध्द पोलीसात तक्रार

शेतकऱ्यास धमकी: आमदार नारायण पाटील यांच्याविरूध्द पोलीसात तक्रार

Next


सोलापूर : शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे नाही तर तुला टांगून मारेल अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्यावर शेतकऱ्यांने केलाय . तसेच आमदार नारायण पाटील यांच्या पासून आपल्या जीवाला धोका आहे असा तक्रारी अर्ज रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलीस अधीक्षक एस़ विरेश प्रभू यांच्याकडे केली आहे़ नारायण पाटील हे करमाळ्याचे आमदार आहेत.
रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे . या शेतातील पाईप लाईन सचिन नरोटे यांनी फोडली . या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला . तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून आरोपी कांबळेंना धमकावत होते़ शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी देखील मोबाईल वरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारी अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केलाय़ आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळेंनी केलीय़

Web Title: Threat to the farmer: Complaint against policeman Narayan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.