उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या महिलेला डांबून ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा
By विलास जळकोटकर | Published: May 19, 2024 06:20 PM2024-05-19T18:20:35+5:302024-05-19T19:08:34+5:30
सोलापुरात सत्यम चौक परिसरातील प्रकार
विलास जळकोटकर / सोलापूर : हातउसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तिघांनी मिळून घरामध्ये डांबून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी १२ च्या सुमारास सत्यम चौक परिसरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रोहिणी अनिल निंबाळकर (वय- ३१, रा. आंबिका नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
सागर श्रीशैल यादवाड, विजया श्रीशैल यादवाड, श्रीशैल गिरमलप्पा यादवाड (सर्व रा. साईराज अपार्टमेंट, सत्यम चौक, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या तिघांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी महिला आंबिका नगरात स्वामी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. फिर्यादीने नमूद आरोपींना हातउसने म्हणूण दिलेले पैसे मागण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास सत्यम चौक परिसरातील साईराज अपार्टमेंट येथे गेल्या होत्या. यावर नमूद आरोपींनी ‘तुझ्या पैशाचं आम्हाला काय माहिती नाही’ असे म्हणून तिला घरामध्ये डांबून शिवीगाळ, लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत.