अंकुल चव्हाण खून खटल्यातील तीन आरोपींचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:14+5:302021-07-10T04:16:14+5:30
यावेळी मूळ फिर्यादी आकाश चव्हाण यांनी ॲड. कुलदीप क्षीरसागर यांच्या मार्फत आरोपींच्या जामीन अर्जास विरोध करून लेखी हरकत नोंदवून ...
यावेळी मूळ फिर्यादी आकाश चव्हाण यांनी ॲड. कुलदीप क्षीरसागर यांच्या मार्फत आरोपींच्या जामीन अर्जास विरोध करून लेखी हरकत नोंदवून त्यांनी कोर्टासमोर आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, आरोपी गुन्हा घडल्यापासून २ वर्षे ७ महिने फरारी होते, तर कोर्टाने याच गुन्ह्यातील इतर आरोपींचा जामीन यापूर्वीदेखील नाकारलेला असून, आरोपी फरार असताना आरोपींच्या नातेवाइकांनी फिर्यादी तथा साक्षीदार यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून, तसेच मारहाण करून आरोपींविरुद्ध पोलिसांसमक्ष जबाब का दिले, या कारणावरून मारहाण व धमक्या दिल्याचे गुन्हे नोंद झाल्याचे न्यायालयाच्या समोर सादर केले. याचा विचार करून या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. यात आरोपी तर्फे ॲड. महेश जगताप, ॲड. प्रशांत एडके, तर सरकारतर्फे ॲड. प्रदीप बोचरे व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. कुलदीप क्षीरसागर यांनी काम पाहिले.
----