साडेतीन लाख लहान-मोठ्या जनावरांचे होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:01+5:302021-06-11T04:16:01+5:30
यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील पशुधनात घट होऊ लागली आहे. तरीही आज अनेक शेतकरी बैलांकरवी शेतीची कामे करून घेत असल्याचे चित्र ...
यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील पशुधनात घट होऊ लागली आहे. तरीही आज अनेक शेतकरी बैलांकरवी शेतीची कामे करून घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या साथ रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगोला येथील पशुचिकित्सालयास तालुक्यातील लहान-मोठ्या जनावरांसह शेळ्या-मेंढ्यांना लसीकरण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
सांगोला तालुक्यात १ लाख ९० हजार लहान-मोठी जनावरे असून, १ लाख ७३ हजार शेळ्या-मेंढ्या असे पशुधन आहे. त्यानुसार सांंगोला पशुचिकित्सलयाकडे २४ हजार घटसर्प, २० हजार फऱ्या व ३० आंत्रविषार असे ७४ हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहेत. सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून डोस उपलब्ध होतील त्यानुसार तालुक्यातील श्रेणी एकचे १६ व श्रेणी दोनचे ८ पशु चिकित्सालयाकडे वाटप करून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोट ::::::::::::::::
पावसाळ्यात जनावरे व शेळ्या-मेंढ्यांना लसीकरणाव्यतिरिक्त पावसाच्या पाण्यातून जंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यादृष्टीने जंतुनाशक औषधाचे डोसही दिले जाणार आहेत.
- डॉ. श्रीकांत सुर्व
पशुधन विकास अधिकारी, सांगोला