राष्ट्रीय प्रदर्शनात सोलापूरची तीन जनावरे चॅम्पियन
By शीतलकुमार कांबळे | Published: March 27, 2023 02:28 PM2023-03-27T14:28:31+5:302023-03-27T14:29:01+5:30
या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील तीन जनावरांना पारितोषिके मिळाली.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी (ता. राहता, जि. अहमदनगर) येथे २४ ते २६ मार्च २०२३ या दरम्यान महापशुधन एक्स्पो-२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील तीन जनावरांना पारितोषिके मिळाली.
खिलार गटातून पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रणजीत जाधव यांचा बैल चॅम्पीयन ठरला. खिलार गाई गटाममध्ये मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील सुनील पवार यांची खिलार गाईला पुरस्कार मिळाला. तर पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील समाधान अधटराव यांच्या पंढरपुरी म्हशीला चॅम्पीयनचा पुरस्कार मिळाला.
या प्रदर्शनात जिल्ह्यातून ५२ जनावरांनी भाग घेतला होता. यात ३७ खिलार १५ पंढपुरी म्हशींचा समावेश होता. सहभागी सोबत पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिनकुमार मोरे यांची उपस्थिती होती. शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत एक्सपो भरविण्यात आला होता. देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"