माढ्यात तीन अर्ज दाखल.. कशी असेल निवडणुकांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:15+5:302020-12-25T04:18:15+5:30

यासाठी ४७ आर.ओ. नेमण्यात आले आहेत. शहरातील तहसील कार्यालय शासकीय धान्य गुदाम व नगरपंचायत सभागृह याठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था ...

Three applications filed in Madha .. How to prepare for elections | माढ्यात तीन अर्ज दाखल.. कशी असेल निवडणुकांची तयारी

माढ्यात तीन अर्ज दाखल.. कशी असेल निवडणुकांची तयारी

Next

यासाठी ४७ आर.ओ. नेमण्यात आले आहेत. शहरातील तहसील कार्यालय शासकीय धान्य गुदाम व नगरपंचायत सभागृह याठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पार पडत असून, गुलाबी थंडीसोबत राजकीय चर्चेची गरमागरम ऊब गाव कारभारी मध्यरात्रीपर्यंत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया असल्याने शहरातील ठिकाणी इच्छुक उमेदवाराची निवडणूक संदर्भात कागदाची पूर्तता करण्यासाठी लगबग असल्याने तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळात आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांच्या पदरी निराशा आल्याचे दिसतेय. यामुळे बेमाप खर्चाला लगाम बसणार असून, खर्च कुणी करायचा यावर मोठ्याप्रमाणात खलबते सुरू आहेत.

कोणत्या गावाचे कुठे स्वीकारले जाणार अर्ज

माढ्यातील तहसील कार्यालय आवार येथे अरण, लोंढेवाडी, कुंभेज, शिराळ (टे.), बादलेवाडी, खैराव, पाचफुलवाडी, केवड, चव्हाणवाडी, शिराळा (म.), उजनी (म.), निमगाव (मा.), महातपूर, तडवळे (म.), वडाचीवाडी (म ) बिटरगाव, बारलोणी, गवळेवाडी, सापटणे भोसे, शिंदेवाडी.

शासकीय धान्य गुदाम या ठिकाणी मोडनिंब, उपळाई बुद्रूक वडाचीवाडी ( उ बु), वाकाव, खैरेवाडी, जामगाव, सुलतानपूर बुद्रुकवाडी, कापसेवाडी, उंदरगाव, धानोरे, रिधोरे, तांदुळवाडी, चिंचगाव, भोगेवाडी, ढवळस, आकुंभे, परिते, परितेवाडी, दहिवली, चव्हाणवाडी, घोटी, मिटकलवाडी, माळेगाव, शेवरे, शिराळ (टे.), फुटजवळगाव, आलेगाव (बु.)आलेगाव, टाकळी (टे.) अंजनगाव (ऊ.), वडाचीवाडी.

माढा नगरपंचायत सभागृह येथे

कुर्डू, मानेगाव, बेंबळे, विठ्ठलवाडी उपळाई खुर्द उपळवाटे, शेडशिंगे, पालवण, भुताष्टे, पापनस,रणदिवेवाडी जाधववाडी (मा.), वेतळवाडी, कव्हे, महादेववाडी, लहू, आकुलगाव, जाधववाडी (मो.) बैरागवाडी, सापटणे (टे.) आहेरगाव व्होळे, वरवडे, बावी, सोलंकरवाडी, अकोले बु. चव्हाणवाडी (टें.) सुर्ली, अकोले (खु.), राझांणी, गारअकोले, रुई नागोर्ली, लऊळ.

----

फोटो ओळी :

माढा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून घेण्यासाठी प्रशासनाने केलेली तयारी.

Web Title: Three applications filed in Madha .. How to prepare for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.