पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:39 PM2018-03-23T12:39:02+5:302018-03-23T12:39:02+5:30

सर्व आरोपी पंढरपुर शहरातील  : पंढरपूर पोलीसांकडून तपासाला गती

Three arrested in connection with Pandherpur corporator Sandip Pawar murder case | पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक

पंढरपूर नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी लोकेशन सांगणाºया तिघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणखी कोणाकोणाचे नाव पुढे येणार...

पंढरपूर : अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणात मारेकºयांना संदीप पवार यांचे लोकेशन सांगणाºया तिघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आकाश हनुमंत बुराडे, लल्या उर्फ रूपेश दशरथ सुरवसे (रा. गवंडी गल्ली, पंढरपूर) व सचिन भगवान वाघमारे (रा. कासेगाव, ता. पंढरपूर) अशी आरोपींची नावे आहेत. 

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये अज्ञात इसमांनी पिस्तुलाने गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती. या प्रकरणातील अक्षय उर्फ बबलू सुरवसे (सध्या राहणार सांगली), पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर, भक्तराज धुमाळ (तिघे रा. पंढरपूर) या चौघांना माजीवडा येथे ठाणे पोलिसांनी पकडले होते. संदीप अधटराव, विकी मोरे हे दोघे पळून गेले होते.

गुरुवारी पंढरपूर पोलिसांनी आकाश हनुमंत वाघमारे, लल्या उर्फ रूपेश दशरथ सुरवसे व सचिन भगवान वाघमारे या तिघांना अटक केली आहे. हे तिघे संदीप पवार यांच्या घराजवळ राहतात. त्यांनी संदीप पवार यांच्यावर पाळत ठेवून होते. संदीप पवार यांच्या ठावठिकाणाची पूर्ण माहिती अक्षय उर्फ बबलू सुरवसे याला देण्याचे काम केले आहे. 

पाच दिवस पोलीस कोठडी 

  • - आकाश हनुमंत बुराडे, लल्या उर्फ रूपेश दशरथ सुरवसे (रा. गवंडी गल्ली, पंढरपूर) व सचिन भगवान वाघमारे (रा. कासेगाव, ता. पंढरपूर) यांना प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
  • - मारेकºयांना अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचे लोकेशन सांगणाºया आकाश हनुमंत बुराडे, लल्या उर्फ रूपेश दशरथ सुरवसे (रा. गवंडी गल्ली, पंढरपूर) व सचिन भगवान वाघमारे (रा. कासेगाव, ता. पंढरपूर) या तरुणांवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. यामुळे पुढील तपासादरम्यान आणखी कोणाकोणाचे नाव पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Three arrested in connection with Pandherpur corporator Sandip Pawar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.