रस्त्यात अडवून लुटणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:31+5:302021-06-09T04:27:31+5:30
योगेश दादासाहेब जाधव (वय ३१, रा. भोसले वस्ती, तुंगत) हे १८ मे रोजी त्यांच्या दुचाकीवरून पंढरपूर येथून तुंगत येथे ...
योगेश दादासाहेब जाधव (वय ३१, रा. भोसले वस्ती, तुंगत) हे १८ मे रोजी त्यांच्या दुचाकीवरून पंढरपूर येथून तुंगत येथे जात होते. यावेळी देगाव हद्दीतील घाडगे वस्तीजवळ त्यांना तिघांनी अडविले. त्यांच्या खिशातील ५० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने घेऊन गेले व त्यांना मारहाण केली. याप्रकरणी लखन रायाप्पा काळुंखे (वय २३, रा. ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, पंढरपूर), आशू दत्ता जाधव (वय २०), गणेश बिरू कांबळे (वय २२, रा. सेंट्रल नाका, भोसले चौक, पंढरपूर) यांना ४ जून रोजी अटक केली.
तपासादरम्यान त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी ४४ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १३/डीसी ८४१५) जप्त केली आहे. यापूर्वीही अटक आरोपी लखन गयाप्पा काळुंखे, आशू दत्ता जाधव यांच्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि ओलेकर, सपोनि खरात, पो.ह. सुजित उबाळे, पो.ह. सुधीर शिंदे, पो.ह. राजा गोसावी, पो.कॉ. भराटे, सायबर विभागाचे पो.कॉ. अन्वर आतार यांनी केली. तपास सपोनि एस. के. ओलेकर करीत आहेत.